मायेच्या हाताला
ओलावा फार
ठेवता हात पाठीवर
' ती ' चा केवढा आधार
जिच्यामुळे घरातील अनेक गोष्टींची योग्य सुरुवात होण्यास मदत होते, जिच्यामध्ये देवीचा वास आहे असे समजले जाते, जी सृष्टी वरील मानवजातीच्या अस्तित्वामधील एक महत्वाचा धागा आहे, जिच्यामध्ये स्वतःची एक वेगळीच शक्ती व सामर्थ्य सामावलेले आहे, जी प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्वाची भूमिका बजावते अशी व्यक्ती म्हणजे स्त्री..!!
तिच तिला गवसली
पुनरपि जन्मा आली
चारधाम यात्रा तिची
याच जन्मी पूर्ण झाली
बाल्य ते वार्धक्य चार अवस्था तिच्यातील पक्षिणीने मोठ्या आत्मीक शक्तीने पार पाडल्या...
आई अंबाबाई | काय वर्णू तुला |
भावते मजला | रूप तुझे ||१||
नवरात्री पूजा | करूया श्रध्देने |
भक्ती भावनेने | स्त्री शक्तीची ||२||
आत्ताच बेंगलोरहून लातूरला जाण्यासाठी रेल्वेत बसलो अन् आठवण झाली ती शाळेत असताना वाचलेल्या कवितेची जीचे शीर्षक होते झुक झुक झुक झुक अगीनगाडी खर तर ती अगीनगाडी न रहाता आता लाईटगाडी झाली आहे पण गाडीत बसल्यास तोच बाज अन् आवाज कायम आहे.
अंबाबाईचे दर्शन घ्यायचे मनात ठरवूनच ठेवले होते. खूप गर्दी असेल, रांगा असतील ,धक्काबुक्की असेल, हे सर्व गृहीत धरूनच जायचे ठरवले. यावेळी देवीची ओटी, शुभ्र फुलांचा हार, साडी, खण ,नारळ, देवीसाठी मंगळसूत्र ,असं सगळं साग्रसंगीत घेऊन गेले होते.आवारा पासूनच भलीमोठी रांग होती.
गोष्ट आहे २००४ मधली. तेव्हा माझा धाकटा मुलगा मल्हार पहिलीत म्हणजे ६ वर्षांचा होता. त्याला एक सवय होती, रोज रात्री झोपतांना मी त्याला एक गोष्ट सांगावी आणि तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायची नाही. रामायण, महाभारत यांतल्या छोट्या गोष्टी सांगून झाल्या मग आता रोज नवीन गोष्ट काय सांगायची मला प्रश्न पडायचा.
चांगले किंवा वाईट अनुभव माणसाला शहाणपण देतात हे खरं असलं तरी प्रत्यक्ष भयंकर अनुभव अनुभवत असताना नंतर त्यातून मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा लवकर सुटावं त्यातून अशीच भावना असते. असाच एक थरारक अनुभव माझ्या वाट्याला आला २०२१ मध्ये गांधी जयंतीच्या दिवशी ,अर्थात २ ऑक्टोबरला.गांधीजयंतीचा आलेल्या अनुभवाशी काहीच संबंध नाही हे नमूद करते.
अजूनही तो दिवस आठवला तरी शहारा येतो ! 26/11 ची ती काळरात्री होती माझा मुलगा आणि सुनेसाठी! जुलै 2008 मधे माझ्या मुलाचे लग्न होऊन ती दोघं मुंबईला गेली.दोघांनीही हाॅटेल मॅनेजमेंट केल्यामुळे चांगल्या प्रसिद्ध हाॅटेलमधे दोघांची नोकरी चालू होती.नवीन नवीन लग्न झाल्याने फिरणे ,ड्राईव्ह ला जाणे चालू असायचे.
पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...