मराठीतील नामवंत लेखक आपल्याकडे येऊन गप्पा मारून जातात. त्याच गप्पांची रंगलेली अनौपचारिक बैठक म्हणजे शब्दयात्री. आजवर असे ७ शब्दयात्री आपल्याकडे येऊन गेले आहेत. कविता, कादंबरी, पत्रकारिता, नाटक, चित्रपट अश्या विविध विषयांमध्ये प्रतिथयश असे लेखक आपल्या लेखनाबद्दल, त्या प्रक्रियेबद्दल मोकळेपणाने बोलतात.
१ ले शब्दयात्री : जितेंद्र जोशी, कवी, अभिनेते
२ रे शब्दयात्री : चारूहास पंडित, 'चिंटू' कार
३ रे शब्दयात्री : द्वारकानाथ सांझगिरी, प्रसिद्ध क्रिकेट तज्ञ
४ थे शब्दयात्री : वैभव जोशी, सुप्रसिद्ध कवी, गीतकार
५ वे शब्दयात्री : परेश मोकाशी, सुप्रसिद्ध नाटककार, चित्रपट लेखक - दिग्दर्शक
६ वे शब्दयात्री : प्रसन्न जोशी, प्रसिद्ध पत्रकार
७ वे शब्दयात्री : विश्वास पाटील, प्रसिद्ध कादंबरीकार
८ वे शब्दयात्री : श्रीपाद ब्रम्हे आणि नेहा लिमये, मराठी भाषा तज्ञ
९ वे शब्दयात्री : डॉ. वर्षा तोरडमल आणि स्नेहा अवसरीकर, लेखिका - प्राध्यापिका
१० वे शब्दयात्री : डॉ. मृदुला बेळे, लेखिका - प्राध्यापिका
११ वे शब्दयात्री : डॉ. प्रकाश कोयाडे, कादंबरीकार
१२ वे शब्दयात्री : देवयांनी एम. , लेखिका
No comments:
Post a Comment