Sunday, 20 October 2024

उंबरठा

ओलांडून ये उंबरठा

झुगारुन दे बंध सारे

आकाशात घे भरारी

भरुनी पंखात वारे



नमूनी शारदेस तू

उघड ज्ञानाचे कवाड

मनातल्या भयगंडास तू

यमसदनास धाड


खुशाल आता चाख तू

स्वातंत्र्याची अवीट गोडी

स्वावलंबनाचा लगाम धरुनी

हाक आयुष्याची गाडी


साथी असू दे जीवनात परी

अस्तित्व तुझे राख अबाधित

लक्ष्य तुझ्या जीवनाचे

तूच ठरवणार .. कर हे निश्चित


स्त्री म्हणूनी जगापुढे ये

नच असावी तू केवळ मादी

अधिकार तुझे तुला मिळावे

नकोत नुसते घोडे कागदी


कुंचला धरुनी अपुल्या हाती

चित्र आयुष्याचे तू रेखाटावे

आनंदाचे क्षण वेचण्या

मनाजोगते रंग भरावे


© सविता भुरे-जोशी, पुणे ✒️

No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...