Sunday, 20 October 2024

जय दुर्गा माता (अभंग)

आई अंबाबाई | काय वर्णू तुला |

भावते मजला | रूप तुझे ||१||


नवरात्री पूजा | करूया श्रध्देने |

भक्ती भावनेने | स्त्री शक्तीची ||२||


जय दुर्गा माता | शक्ती असे एक |

नावे ती अनेक | माते तुझी ||३||


दर्शनाने तुझ्या | मिळे समाधान |

अखंड चिंतन | चरणाशी ||४||


आदिशक्ती माता | सांग सकलांना |

दैत्य निर्दालना | तुजसम ||५||


साऱ्या जगाची तू | प्रेमळ जननी |

पूजती भगिनी | गौरी माते ||६||


-- सुनिता वैद्य 


No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...