मायेच्या हाताला
ओलावा फार
ठेवता हात पाठीवर
' ती ' चा केवढा आधार
' ती ' च्या कर्तृत्वाचा
अभिमान फार
चाले घराचा गाडा
जगाचा संसार
' ती ' आहे म्हणून
जग नांदते सुखात
असो दु:ख वा आनंद
' ती ' ची साथ अखंड
' ती ' ने पादाक्रांत केली
सर्व क्षेत्र
असे नाही क्षेत्र
जे ' ती ' ला वर्जित
प्रत्येकाच्या ओठी
एक जयघोष
नारी तुला सलाम
नारी तुला सलाम...........
©✍🏼.....यशवंत देव
No comments:
Post a Comment