Friday, 4 October 2024

ती काळरात्र !

 अजूनही तो दिवस आठवला तरी शहारा येतो ! 26/11 ची ती काळरात्री होती माझा मुलगा आणि सुनेसाठी! जुलै 2008 मधे माझ्या मुलाचे लग्न होऊन ती दोघं मुंबईला गेली.दोघांनीही हाॅटेल मॅनेजमेंट केल्यामुळे चांगल्या प्रसिद्ध हाॅटेलमधे दोघांची नोकरी चालू होती.नवीन नवीन लग्न झाल्याने फिरणे ,ड्राईव्ह ला जाणे चालू असायचे.


त्यांचा एक मित्र ट्राय डंट हाॅटेलमधे होता.त्याची ड्यूटी संपवून तो निघणार तोच व्ही.टी.स्टेशन वर काही गडबड चालू झाल्याने तिथे कोणाला जाऊ देत नव्हते. म्हणून त्याने माझ्या मुलाला फोन करून सांगितले की मला न्यायला या.त्याप्रमाणे ही दोघं आणि त्यांचा एक मित्र स्कोडा गाडी घेऊन आला व ते तिघे बांद्रा ते ट्रायडंट असे जायला निघाले.पण वाटेत पोलिसांची जीप उलट्या दिशेने येताना पाहून त्यांनी गाडी थांबवली.तोच त्या जीप मधून एकजण बंदूक घेऊन उतरला.व गाडीची किल्ली मागू लागला.(तो साक्षात कसाब होता.)पोलीसप्रमुख गाडीतून उतरलेला हा कोणीतरी भयंकर माणूस आहे ही कल्पना देखील त्यांना नव्हती.पण हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतो आहे असे वाटून त्या मित्राने किल्ली खाली फेकली.तोपर्यंत माझा मुलगा सुनेला घेऊन बाजूच्या फुटपाथवर गेला.इथे त्या मित्रावर संगीन रोखून त्याने फेकलेली किल्ली हातात देण्याची मागणी केली.त्याने किल्ली हातात दिल्यावर तो कसाब गाडी घेऊन सुसाट निघाला.पुढे झटापटीत त्याला पोलीसांनी पकडलं वगैरे !

पण ती वेळच अशी होती की दैव बलवत्तर, म्हणून ह्या तिघांना त्याने काही केले नाही ! कारण व्ही.टी.स्टेशन, हाॅस्पिटल,ताज, ह्याठिकाणी बेछूट गोळीबार करून हजारोंना मारणारा कर्दनकाळ साक्षात समोर होता,तो सहज ह्या तिघांना मारू शकला असता ! परंतु काळ आला पण वेळ आली नव्हती. त्यामुळेच त्याने ह्या तिघांना काहीच न करता सोडले व गाडी घेऊन पसार झाला.अगदी देव तारी त्याला कोण मारी ची प्रचिती आली!

नंतर पोलिसांनी ह्या तिघांना व्यवस्थित घरी पोहोचवले.खूप दिवस पोलीस चौकशीसाठी मात्र पोलीस स्टेशन च्या फेऱ्या कराव्या लागल्या..

नंतर जेव्हा आपण 'कसाब ' ह्या कर्दनकाळाच्या तावडीतून  सही सलामत सुटलो हे समजल्यावर थरकाप च उडाला होता.पूर्व जन्मीचे पुण्य, पूर्वजांचे आणि थोरामोठ्यांचे आशिर्वाद ह्यामुळेच तिघेही सुखरूप घरी आले.हा त्या तिघांचा पुनर्जन्म च झाला असे आम्ही मानतो.आणि देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानतो.

आता नोव्हेंबर महिना आला की 26/11 ची जीवघेणी आठवण होऊन धडधडतं !आणि मुलांना वाचवल्याबद्दल देवाचे शतशः ऋणी राहतो.

असा हा अविस्मरणीय दिवस कोणाच्याही आयुष्यात न येवो!

- शमिका 

No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...