प्रजासत्ताक
ठरलेल्या दिनी ठरलेल्या वेळी,
नित्य पंरपरेने साजरा होतो एक देखणा सोहळा,
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा!
जवानांच्या नियोजनबद्ध कवायती,
विमानांच्या चित्तथरारक
हवाई कसरती,
बघणार्यांच्या ह्रदयाचे ठोके चुकविती!
आकर्षक चित्रथातून दिसे
देशाची सर्वांगीण प्रगती!
सामर्थ्य आपुले पाहून
अभिमानाने येई ऊर भरून!
विद्या -कला-शौर्याचा घडे येथे त्रिवेणी संगम,
प्रत्येक क्षेत्राचा होई उचित गौरव!
सलाम त्या वीरांना,
ज्यांच्यामुळे साजरा होतो
हा देखणा सोहळा!
No comments:
Post a Comment