अक्षर अक्षर जुळवून, तयार होतो शब्द,
शब्द शब्द जपून वापरा ,करू नका प्रतिशब्द!
शब्द शब्द जोडून तयार होते वाक्य,
वाचणाऱ्या चे ओसंडून वाहते औत्सुक्य!
वाक्या वाक्यांनी तयार होते कथा कादंबरी,
कवि लोकांना वाटते,ह्यापेक्षा कविताच बरी!
रात्रशाळेत करतात अक्षरओळख सर आणि बाई,
अंगठेबहाद्दर पण करू लागतात मग ऐटीत सही !
अशा ह्या अक्षराचा असतो मोठा थाट ,
मात्र अक्षरांच्या अदलाबदलीने पेशवाईत लागली वाट !
असा हा अक्षरांचा महिमा , खूप काही सांगून जातो,
आणि योग्य त्याच्या वापराने आपण सुंदर आयुष्य जगतो !
No comments:
Post a Comment