Monday, 10 February 2025

अक्षर - दुष्यंत देशपांडे , कराड

 अक्षर


अक्षर अक्षर जुळवून जेंव्हा 

          शब्द तयार होतो 

सुखदुःखाच्या गोष्टी तेंव्हा

           तो सांगून जातो !

 अक्षरानेच शब्द बनतो 

      आणि शब्दानेच भावना

 भावनेनेच एक एक उमलते

        गद्य पद्यातील संवेदना !

 उमटल्या ज्या मनात संवेदना

        कागदावरही उतरती 

सारा खेळ मग शब्दांचा

         हळुवार ते पाझरती !

 कोणी लिहिली सुखदुःखाच्या गोष्टी

          कोणी दुःखा वेग 

कोणी सांगती कर्म कहानी 

          कोणी संचित योग  !

अक्षरानेच उभे राहिले 

         शब्दांचे ते डोंगर सारे 

कांही नजरेत पाहू जाता

      दिसती अक्षरा विना ही काही अक्षरे !!



No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...