मी,माझं, माझा ,माझी..हे सगळे शब्द अधिकार ,
possessiveness दर्शवतात.
आपल्या अगदी बाल्यावस्थेतच या शब्दाची ओळख होते.आवडीच खेळणं,वस्तूला कुणी हात जरी लावला,किंवा आपल्या आईच्या कडेवर दुसर्याच बाळाला बघितलं तर रडून ,ओरडून निषेध व्यक्त केला जातो....हे माझं आहे हे सांगितलं जातं.
आवडलेली कुठलीही गोष्ट
माझं..माझं करून कुणालाही दिली जात नाही.
' माझा होशील का ' असं वाटत असताना हे वाटणं प्रत्यक्षात आलं तर मग 'तुझं..माझं' न राहता 'आपलं 'होऊन जातं ,आणि यात सर्वसमावेशक भाव असतो.
वयाची साठी ओलांडताना
बर्याच जबाबदाऱ्या पार पडलेल्या असतात. या टप्प्यावर ' इदं न मम '
ही जाणीव खरंतर हवी ,पण...माझं..माझं करत कवटाळून बसलो तर संघर्ष अटळ असतो.
तेव्हा , वेळीच मनाला आवर घाला..निरिच्छ होऊन अलिप्त व्हायला शिका.
माझं..माझं न करता 'इदं न मम ' म्हणा आणि उर्वरित आयुष्य सुखात समाधानात घालवा.
No comments:
Post a Comment