कट्टा भावार्थचा
नित्य नवीन लिहिण्याचा
अन् नवे विचार मांडण्याचा
कट्टा सांगतो सगळ्यांना
लिहिते व्हा लिहिते व्हा
मनातील भावनांना व्यक्त करा
उचलली लेखणी पटकन
लिहू लागले झटकन, अन्
शब्द शब्द आले की ओघळून
बघता बघता व्यक्त झाले
वहीचे पान भरुन गेले
आणि काव्य माझे पूर्ण झाले...
No comments:
Post a Comment