माणसासारखं वाग
बघ बाळा जग चाले जरी
पैशासाठी आज!
एक लक्षात ठेव तू मात्र चांगल्या मांणसा सारखा वाग....
पैसा महत्वाचा आयुष्यभर
तो जपायलाच लागतो
पण आपल्या माणसासाठी कधी
सोडूनही द्यावा लागतो
आज सोडतोय उद्या मिळविन
मनगटावर ठेव विश्वास...
पण माणसाशी मात्र नेहमीच बाळा
माणसासारखं वाग....
मोठया माणसाला मान बाळा
नेहमीच द्यायला हवा
पण विचाराच्या बदलांचाही
विचार करायलाच हवा
काय योग्य काय अयोग्य
गुंता सोडवणं पडतच भाग
पण लक्षात ठेव माणसाशी नेहीमी
मांसासारखच वाग....
ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो
ज्याचे त्याचे विचार
कुणाला किती द्यायचं म्हणत्व
ठरवावच लागतं यार....
थोडासा विवेक असला की
सगळं पडतं नीट पार
तू मात्र माणसाशी माणसासारखंच वाग.....
मोठेपणा, अभिमान बाळगू नको जास्त
खरं नात आपलं आपल्या मातीशीच असतं
त्या त्या वेळच्या परिस्थितीवर सगळं ठरत असतं
कोणी वाईट म्हणालं म्हणून नेहमी तसच नसतं !
विवेक बुद्धी जागी ठेऊनच द्यावा दुसर्यांना भाव
पण बाळा माणसाशी नेहमी माणसा सारखंच वाग
योग्य वेळीच योग्य गोष्ट करण्यासाठी वाक
गरज नाहिये कुणाला
तर दुरूनच बघ ...
कामात असलास तरी
माणुसकीच्या गरजेला जाग..
माणसाशी नेहमी बाळा माणसासारखं वाग....
No comments:
Post a Comment