Monday, 10 February 2025

भाव - सौ.लता बापट

 शब्दांच्या आतिशबाजीत हरवून जायचं नसतं

बरोबर आहे सखये 

पण शब्द तर हवेच असतात ना ग 

अलंकारिक नटलेले....

त्या शब्दांनीच तर फुलोरा फुलतो 

भावनांना बहर येतो 

आतिषबाजीत हरखून जाणे असते नयनांचे 

अन् शब्दांनी हरखून जातात 

भाव हृदयीचे 

काही क्षण मन तरंगत असतं 

हरवून जातं 

एक लक्षात असू दे सखये 

भानावरही ते क्षणात येतं 

मैत्र जेंव्हा जागृत असतं 

शब्दांच्या आतिशबाजीत हरवून जायचं नसतं

बरोबर आहे सखये 

पण शब्द तर हवेच असतात ना ग 

अलंकारिक नटलेले....

त्या शब्दांनीच तर फुलोरा फुलतो 

भावनांना बहर येतो 

आतिषबाजीत हरखून जाणे असते नयनांचे 

अन् शब्दांनी हरखून जातात 

भाव हृदयीचे 

काही क्षण मन तरंगत असतं 

हरवून जातं 

एक लक्षात असू दे सखये 

भानावरही ते क्षणात येतं 

मैत्र जेंव्हा जागृत असतं 



No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...