कृष्ण
यशोदेचा नंदलाला
करी नवनीत चोरी
मित्रांसवे करी काला
कृष्णसखा गिरीधारी..…
राधेसंगे रास खेळे
पावा वाजवी मुरारी
कंसनिर्दालन करी
कृष्णसखा गिरीधारी.....
द्रौपदीची लाज राखी
पांडवांची रक्षा करी
रणांगणी गीता सांगे
कृष्णसखा गिरीधारी......
तत्वज्ञान गीतासार
संसाराला पार करी
अद्वैतापर्यंत नेई
कृष्णसखा गिरीधारी...
फक्त ..........
कृष्णसखा गिरीधारी
No comments:
Post a Comment