कुठे गर्द रानी
सूर्यास्त दिसावा
अशा सांजवेळी
धुके दाटले
शोधण्या जे निघालो
ते न मिळता तरीही
रिकाम्या च हाती
मी परतलो
घ्यावे म्हणता भरुनी
न मावेल इतके
रिकामीच ओंजळ
भरुनी, धुके वेचलो
स्तब्ध व्हावे क्षणांनी
ना दिन हा सरावा
इथेच विरावा,असा
उभा राहिलो
शोधण्या जर निघशील
आठवणीत माझ्या
इथेच विरून मी
भरून राहिलो....
अन् उरून राहिलो.....
No comments:
Post a Comment