Monday, 10 February 2025

हट्ट - राजश्री मानकर


हट्ट केला ध्रुवबाळाने मांडीवरी बैसण्याचा,

अढळपदी जाऊनीया आकाशात स्थिरावला।

हट्ट केला प्रभू रामाने चंद्रास मिळविण्याचा,

पाण्यात प्रतिबिंब दावूनी कौसल्येने तो पुरविला।

हट्ट केला सीतामाईने मृगाजिनाचा,

हट्ट पुरविण्यापाई रामायण ते घडले।

हट्ट असे पुराणातले

गोष्टीरूपे बालमना रिझविती।

लहानग्यांचे छोटे छोटे हट्ट मात्र,

पालकांना संभ्रमात बुडविती।

चॅाकलेटसच्या हट्टापायी दात किडण्याचे भय,

कितीही समजाविले तरी अश्रूंपुढे हात टेकण्याचे वय।

कपडे, खेळण्यांचे हट्ट तर नित्याचेच,

पुरवितांना होणाऱ्या काहीशा ओढग्रस्तीचेच।

हट्ट शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा,

मायेच्या स्पर्शांना पारखे होण्याचा।

हट्ट असा करावा की

दुखू नये कुणाचेही मन।

हट्ट पुरवताना समाधानाने 

फुलावे सभोवतालचे रान।


No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...