एक छकुली घरात दिसते
आनंदात ती अशी रमते
खेळताना ती इकडे तिकडे
किती ती अल्लड दिसते
पाहताना रोज तिला मी
पाहतानाही हरवून जातो
म्हणते बाबा बाबा मला ती
त्या हाकेने किती सुखावतो
आईपाशी ती हट्ट करते
मला पाहता लपून बसते
ओळखता मी सर्वकाही
हट्ट पुरविण्या मन माझे रमते
अशी माझी गोड छकुली
एक दिवस मोठी होते
म्हणताना ती आईबाबा
येते म्हणूनी आम्हा सांगते
अशी छकुली जाताना
सांगून जाते डोळ्यांमधुनी
असली मी जरी छकुली
काळजी घेईन सर्वकाही
होईन आईबाबा आता मी
नका रडू जातानाही
असेल सोबत मी अशीही
जसे जपले छकुलीस तुम्हीही.............
No comments:
Post a Comment