Monday, 10 February 2025

मोह - शर्वरी जोशी

 सावर सावर अंबाबाई

सावर सावर अंबाबाई संसाराचा 

घोळ ग

संसाराचा घोळ ग, मनीचा हलकल्लोळ ग...

भवसागरी या पोळतो जीव

दिखाउपणाचे चहूकडे पेव

धावलो किती तरी भेटेना देव

सर्वत्र माजला गोंधळ ग

सावर सावर अंबाबाई.......

फाटक्या तुटक्याचा जमवुनी संसार

भावभावनांचा त्यामध्ये वावर

मन जेव्हा होई कातर

 प्रेमळ शब्दा जीव अधीर पण..

 कोरडाच मिळतो धीर ग..

सावर सावर अंबाबाई संसाराचा 

घोळ ग......

कित्ती जमा तरी लालसा तूटेना

अर्थ हव्यास मिटता मिटेना

संसाराची गाठ अविट सुटेना

माया मोह कसा टाळू ग ....

सावर सावर अंबाबाई .......

नात्या गोत्यांचा एवढा ढिगारा

एक ना धड चिंध्या भाराभरा

मान  सांभाळा,मन आवरा

आपल्या मताला नाही थारा ग ...

सावर सावर अंबाबाई 

संसाराचा घोळ ग 

संसाराचा घोळ ग...

मनीचा हलकल्लोळ ग....


No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...