घरच्या अंगणात
प्राजक्ताचा सडा पडला
ओंजळीत घेऊनत्याच्या
गंधाने मन भरून घ्यायचा
'मोह' मला झाला
रांगत आलं चिमुकलं बाळ
त्याच्या पायीचा वाजे वाळा
नादाने त्या भारावले मी
उचलून घ्यायचा 'मोह' मला झाला
आजीचा मऊशार रेशमी
हात चेहऱ्यावर फिरला
स्पर्शाने त्या मोहरले मी
"मोह"मिठीचा झाला
राऊळातले रूप सावळे
मोरमुकुट पितांबरधारी
रूपाने मज वेड लावले
मोहातच मी गुरफटले पुरी
शब्द स्पर्श अन् रूप गंध
मोहविती मजला जरी
विवेक म्हणतो सांभाळ जराशी
नीरक्षीर मनाशी करी
No comments:
Post a Comment