Monday, 10 February 2025

संक्रांत - धिरज विलासराव कुलकर्णी नांदगावकर

 ,तिळगुळ घ्या गोडगोड बोला


मनाने मनाला समजून घ्यावे

इतरांबद्दल ममत्व असावे


कोणाची निंदा नालस्ती नको

कोणाला कमी लेखणे नको


मिळालेल्या क्षणाचा आनंद उपभोगावा 

भांडणंतंटा अबोला सोडून द्यावा


करुणा सागर ईश्वराचे मानावे आभार

मानव जन्म देवून केले मोठे उपकार


नात्यांचे बंध जपावे मैत्रीच्या धाग्यांनी

जीवनरुपी नौका पार करावी सामर्थ्यानी


गुळासारखी गोडी तीळासारखी माया 

सद्गुरुंचा आशीर्वाद देवाची छाया

 

कमलसुताचे सर्वांना हेच मागणे

तीळ गूळ घ्यावे ठेवावे गोड बोलणे


तिळगुळ घ्या गोडगोड बोला 



No comments:

Post a Comment

भावार्थ कट्टा

काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन

पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...