येथे नको विसावू, तेथे नको विसंबू
सांभाळ शूरवीरा, तू आपुलाच तंबू
आषाढमेघ यावे, थेंबाविना सरावे
वायाच संगरी का, हे दुंदुभी नि कंबू ?
पंख्याविना विमाने होती म्हणे पुराणी
वैज्ञानिकां विचारा, आता कुठेत चंबू
“जिंकाल विश्व सारे”, सांगे हरेक जोशी
सांगेल का कुणी हो, भावी विधा-विचंबू
फिर्याद फाळणीची सीमेवरी कुणाची
शोधूनही मिळेना, कसला गुन्हा-गजंबू
No comments:
Post a Comment